देश

राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय- राजनाथ सिंह

नवी दिल्ली | कृषी कायद्यांवरून राहुल गांधींनी भाजपवर केलेल्या टीकेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युतर दिलं आहे. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. राहुल गांधी माझ्यापेक्षा लहान आहेत आणि शेतीबद्दल मला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. कारण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे, असं राजनाथ सिंह म्हणालेत.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही. आपले पंतप्रधानांनीही एका गरीब महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मला इतकंच सांगायचं आहे, यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

शेतकऱ्यांविरुद्ध कुणीही असे आरोप करायला नको. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनात असलेला आदर आम्ही व्यक्त करतो. आम्ही मान झूकवून शेतकऱ्यांना नमन करतो. ते आपले अन्नदाते आहेत, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.

थो़डक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची सुपारी; पुण्यात खळबळ

‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा

दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही- शरद पवार

संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत- आशिष शेलार

“मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा हे भाजपचे षडयंत्र”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या