मुंबई | जर कोणत्या पक्षाला आपल्या युती धर्माचं पालन करता येतं तर तो भाजप आहे, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.
आजतक या वृत्तवाहिनीच्या ‘सीधी बात’ या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलासारख्या जुन्या सहकारी पक्षांच्या एनडीएतून बाहेर पडण्यावर राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर काही नवे पक्ष येतात काही जातात, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांची कामगिरी ए वन असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांपेक्षा योगी आदित्यनाथ यांची कामगिरी उत्तम वाटते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. मी कोणाचीही तुलना करू इच्छीत नाही. परंतु मी योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो, असं सिंह म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आलेत”
“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी!
“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?”
“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”