देश

‘…त्यावेळी आम्ही कोरोनावरील लस घेऊ’; राजनाथ सिंह यांनी सांगितली वेळ

नवी दिल्ली | देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री कोरोनाची लस कधी घेणार याबाबत माहिती दिली आहे.

कोरोना विरोधातील लढ्यामधील आमच्या फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण होईल आणि 50 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळी आम्ही राजकीय क्षेत्रा वावरत असलेले लोकही कोरोनावरील लस घेऊ, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.

इतर देशातील लोकांप्रमाणे आपल्या देशातील जनता विचार करेल असं मला वाटत नाही. कारण कोरोनावरील लसीची अंतिम चाचणी झाली आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ही चाचणी घेतली आहे. मला वाटते की देशातील जनतेचा या लोकांवर विश्वास आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा आजपासून शुभारंभ झाला.

थोडक्यात बातम्या-

“…तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल”

मी आज अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

महादेवावर नितांत श्रद्धा असलेल्या मुस्लिम शेतकऱ्यानं स्वखर्चातून उभारलं महादेवाचं मंदिर!

“आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबानी-अदानीसाठी काम करत आहेत”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या