Top News मनोरंजन

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

हैद्राबाद | जेष्ठ अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती खालावली असल्याने हैदराबादमधील अपोलो रूग्णालयात त्यांना दाखल केलंय.

अपोलो रूग्णालयाकडून यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढत यासंदर्भात माहिती देण्यात आलीये. यामध्ये रजनीकांत यांचा ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात अॅडमीट केलं आहे.

रजनीकांत अन्नाथे या चित्रपटाची शूटींग करत होते. मात्र या सेटवर 8 जणांना कोरोनाची लागण झालीये. त्यामुळे खबरदारी म्हणून रजीनकांतही क्वारंटाइन होते. त्यानंतर त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

रजनीकांत यांची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आलीये. आता सध्या इतर कसलाही त्रास जाणवत नसल्याचंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा

“रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या