चेन्नई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणजे कृष्ण-अर्जुनाची जोडी आहे, असं वक्तव्य दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठीचे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. आणि यासाठी त्यांनी मोदी-शहांचं अभिनंदन देखील केलं आहे.
चेन्नईतील एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आणि पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक केले.
अमित शहांनी मिशन काश्मीर पूर्ण केल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा. त्यांनी ज्या पद्धतीने हे काम पूर्ण केले आहे ते जबरदस्त होते. ज्या पद्धतीने त्यांनी संसदेत भाषण केले ते अफलातून होते, असं रजनीकांत म्हणाले आहेत.
दरम्यान, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात रजनीकांत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या-
-काॅंग्रेस सावरायला आलेल्या प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरुंग लावण्याची तयारी सुरु!
-मराठा आरक्षण मिळाल्यापासून या माणसानं 13 हजार जणांना मिळवून दिली जात प्रमाणपत्रं!
-राष्ट्रवादीनं पुण्यातील नळस्टाॅप चौकाचं नाव बदललं!
-“सांगली- कोल्हापूरात अत्यंत गंभीर L3 दर्जाची आपत्ती घोषित करा”
-‘शाहू’नगरीतला मुस्लिम समाज बकरी न कापता देणार पूरग्रस्तांना आर्थिक मदत!
Comments are closed.