चेन्नई | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात एंट्री केली आहे. तसेच ते एक नवा पक्ष स्थापन करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
रजनीकांत हे स्वत: पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील. तसेच जो पक्षाचा नेता असेल तो कधीच सरकारचा भाग नसेल. हा पक्ष तामिळनाडूत बदल घडवेल, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूच्या राजकारणाची माहिती घेत असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं. तसेच त्यांनी डीएमके आणि एआयएडीएमकेचं नाव घेत लोकांना बदल हवा असल्याचंही म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या पक्षात तरूणांना आणि उच्च शिक्षित लोकांना संधी देऊन तामिळनाडूत नवं नेतृत्व तयार करायचं आहे. म्हणूनच आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही नसू, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलंय.
ट्रेंडिंग बातम्या-
राहुल गांधींनी ज्योतिरादित्य आणि कमलनाथ यांचा फोटो केला शेअर; म्हणाले….
कोरोनाची माहिती व्हाॅट्सअॅपवर टाकत असाल तर सावधान, तुमच्यावर होऊ शकते कारवाई
महत्वाच्या बातम्या-
….म्हणून शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करावी- राज ठाकरे
राहुल गांधींच्या मर्जीतील महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याला राज्यसभेचं तिकीट!
“…अन ही मोठ्या घरची पोरं रातोरात गांधींच्या मांडी वरून उठून गोडसेंच्या मिठीत विसावतात”
Comments are closed.