बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुपरस्टार रजनीकांत यांनी भरला सर्वाधिक नियमीत कर, आयकर विभागाकडून गौरव

चेन्नई | रविवारी (दि. 24 जुलै) देशात आयकर दिन (Income Tax Day) साजरा करण्यात आला. यादिवशी मुळचे महाराष्ट्रीयन असलेले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांचा तमिळनाडू (Tamil Nadu) राज्यात सर्वाधिक कर भरल्यामुळे गौरव करण्यात आला. तर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याला मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक कर भरल्याबद्दल सन्मान पत्र देण्यात आले.

दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना नियमितपणे कर भरल्याबद्दल चेन्नईच्या (Chennai) आयकर विभागातर्फे सन्मानित करण्यात आले. तर अक्षय कुमारला मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक कर भरल्याबद्दल सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रजनीकांत यांना काही कारणास्तव या समारंभास उपस्थित राहाता आले नाही. त्यांची कन्या ऐश्वर्या (Aishwarya) हीने रजनीकांत यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन (Tamilisai Sundarrajan) यांच्याकडून हा पुसस्कार ऐश्वर्या हीने स्वीकारला. ऐश्वर्या हीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. सर्वाधिक आणि नियमित कर दात्याची अभिमानी मुलगी, आयकर दिन 2022 रोजी अप्पांचा सन्मान केल्याबद्दल तमिळनाडू आणि पुदुच्चेरी आयकर विभागाचे खूप आभार, असे ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.

रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजी गायकवाड (Shivaji Gaikwad) आहे. त्यांनी 1975 साली चित्रपटात कामे करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना मिळणारे मानधन खूपच नाममात्र होते. नंतर त्यांनी 4 दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात दमदार कामगिरी करत ते आता दक्षिणमधील सर्वाधिक मानधन मिळविणारे अभिनेते आहेत. त्यांना भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पद्म विभूषण (Padma Vibhushan) पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. तसेच चित्रपट जगतातील सर्वोच्च पुरस्कार दादसाहेब फाळके पुरस्काराने (Dadasaheb Falake Award) देखील ते सन्मानित झाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More