Pushpa 2 | साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. अशात हा चित्रपट आता वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, काही गोष्टींवरून थेट चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी देण्यात आली आहे.
राजपूत समजाच्या नेत्यांनी चित्रपटातील खलनायकाच्या ‘शेखावत’ या नावावर आक्षेप घेतला आहे. हा क्षत्रियांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. राजपूत समाजाचे नेते राज शेखावत यांनी पुष्पा-2 चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातील भवरसिंह शेखावत या पात्रावर त्यांनी आक्षेप घेतलाय.
या पात्रामुळे शेखावत समाजाबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या चित्रपटातील शेखावत हा शब्द सगळीकडून काढून टाकावा, अशी मागणीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. हे नाव न हटवल्यास आगामी परिणाम आणि पडसादांना सामोरे जावे लागेल, असा इशारा वजा धमकीच त्यांनी दिली आहे. (Pushpa 2)
काय म्हणाले शेखावत?
“पुष्पा-2 या चित्रपटात शेखावत नावाचे नकारात्मक भूमिका साकारणारे पात्र आहे. हा क्षत्रियांचा अपमान आहे. करणी सेनेच्या सैनिकांनो तयार राहा. या चित्रपटाच्या निर्मात्याला लवकरच धडा शिकवला जाईल,” असं शेखावत यांनी म्हटलंय. (Pushpa 2)
तसेच या चित्रपटात शेखावत समाजाला मुद्दामहून नकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा क्षत्रियांचा अपमान आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.
पुष्पा 2 फ़िल्म मे “शेखावत” का नेगेटिव किरदार, फिर से क्षत्रियों का अपमान, तैयार रहे करणी सैनिक, जल्द फ़िल्म निर्माता की ठुकाई की जाएगी। @aajtak @ABPNews @ZeeNews @VtvGujarati @BBCBreaking @CNNnews18 @timesofindia @TimesNow @htTweets @EconomicTimes @FinancialTimes @JagranNews… pic.twitter.com/vsbm2r3OLL
— Dr. Raj Shekhawat (@IAMRAJSHEKHAWAT) December 8, 2024
News Title – Rajput community leader Raj Shekhawat objection to Pushpa 2 movie
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार
सोन्याची पुन्हा गरुड भरारी, ‘इतक्या’ रुपयांनी झाली दरवाढ
भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण, नंतर हत्या! नेमकं काय घडलं
कुर्ला अपघातातील चालकाबाबत धक्कादायक खुलासा समोर!
ब्रेक फेल की… कुर्ल्यातील अपघातामागचं खरं कारण काय?