बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्त झालेल्या केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी टोपेंचा संवाद; शैलजांनी दिला कानमंत्र

मुंबई  |   देशातला पहिला कोरोनाबाधित रूग्ण ज्या केरळमध्ये सापडला त्याच केरळने आश्यर्चकारकरित्या कोरोनावर आता मात केली आहे. हे व्यवस्थापन त्यांनी अगदी कमी दिवसांत करून कोरोनाला आपल्या मुठीत ठेवलं. त्यांनी हे कसं शक्य केलं, काय उपाययोजना केल्या याचसंबंधी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

केरळचे विलगीकरणाचे धोरण नेमकं कसं होतं? त्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या तसंच दर दिवसाला होणाऱ्या चाचण्यांचा वेग किती होता? तो किती असायला हवा? त्याचबरोबर झोपडपट्ट्यांमधील संसर्ग रोखण्यासाठीच्या केरळने काय उपाययोजना केल्या याबाबतची माहिती के. शैलजा यांनी राजेश टोपेंना दिली.

केरळमध्ये कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी खासगी डॉक्टरांचे सहकार्य मिळाल्याचं शैलजा यांनी सांगितलं. तसंच प्लाझ्मा थेरपीचा वापर देखील केरळने यशस्वीरित्या केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कंटेनमेंट झोनमध्ये प्रतिबंधच असायलाच हवेत, असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं. त्याचबरोबर जनजीवन पूर्ववत होण्यासाठी आता हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली पाहिजे, असं मतंही त्यांनी नोंदवलं.

दरम्यान, महाराष्ट्र शासन आणि प्रशासन कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पावसाळ्यापूर्वी हे संकट आपल्याला परतवून लावायचा आहे, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. तसंच त्याचदृष्टीने आपलं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

मुंबई-पुण्यामधून गावी जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती, म्हणाले…

‘अप्सरा सोनाली’ने दिले आनंदवार्ता… दुबईत पार पडला साखरपुडा!

काल दिवसभरात 749 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी… पाहा तुमच्या भागात काल किती रूग्ण मिळाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More