बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राजसाहेब, मानलं तुमच्या दूरदृष्टीला’; तृप्ती देसाईंची स्तुतीसुमने

मुंबई | बुधवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली आहे.

आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत यासाठी मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली आणि अखेर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव संमत करण्यात आला, असं भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

मराठी पाट्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयाचे खरे श्रेय मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि मनसैनिकानांच आहे. यावरून राजसाहेबांनी याबाबतीत केलेले आंदोलन ही त्यांची दूरदृष्टी होती, हे मान्य केलेच पाहिजे, आता सगळ्याच दुकानांच्या पाट्या मराठीत दिसतील, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

राजसाहेबांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांचे बंधू उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असल्यावर हा निर्णय घेण्यात आला याचा आणखी आनंद आम्हा सर्वांना झाला आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे एक स्वप्न पूर्ण झालं याचाही तितकाच आनंद आहे, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘मी कंगनाजींचा चित्रपट तर नक्कीच पाहणार’; योगींचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

मराठी पाट्यांवरील निर्णयावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपमध्ये नक्की चाललंय काय?; आता सातव्या आमदाराचा पक्षाला रामराम

सेक्स करताना अतिउत्साह नडला; तरूणाला गाठावं लागलं थेट रूग्णालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More