महाराष्ट्र मुंबई

“…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही”

मुंबई | ठाकरे सरकार शिवाजी महाराजांचं नाव सांगून सत्ता भोगत आहेत. मात्र गड-किल्ल्याकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही. गड-किल्ल्याकडे दुर्लक्ष करत महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक अधिक महत्व दिलं जात आहे, असा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गड-किल्ल्यांची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मंडळ तयार करावं, अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं.

छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही, असं राजू पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, सत्ताधारी राजकारणी लोकांच्या भावनेशी खेळत महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत. त्यापेक्षा किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभे राहा, असं मत राजू पाटील यांनी व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या-

रिया आणि शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

चीनने भारताची जमीन घेतली याला सुद्धा देवाची करणी म्हणायचं का?- राहुल गांधी

क्वीन कंगणा एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते 1.5 कोटी तर पुर्ण चित्रपटासाठी…..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या