मुंबई | आमदार राजू पाटील यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ही भेट राजकीय नसून केवळ विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याचं कळतंय.
डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरीसाठी राजू पाटील यांनी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. नेत्यांनी गडकरींना याबाबबतचं पत्र सुद्धा दिलं आहे.
डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन 2009 पासून प्रलंबित आहे. तत्कालिन आमदार स्व.हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन सतत पाठपुरावा केला होता. त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने 93 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती.परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्यापही गती मिळालेली नाही
सर्व तांत्रिक अडचणीवर मात करुन पर्यावरणाचा समतोल राखून, खाजगी जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन हा रस्ता पूर्ण करणे शक्य आहे. तरी डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.
थोडक्यात बातम्या-
सिरमचे संस्थापक माझे मित्र, कोरोना लस घे म्हणाले पण…- शरद पवार
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर
“रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व?”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत, इतरांसारखे भिकारी नाहीत”
एक मुलगा अन् दोन तरूणी, भररस्त्यात सुरू होती हाणामारी; व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल