Uddhav Thackeray l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. अशातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मात्र आता निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात देखील घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं दिसत आहे.
शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी :
मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण विधानसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून हरून खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच हरून खान यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर हे नाराज झाले आहेत. कारण राजू पेडणेकर हे ठाकरे गटाकडून वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते.
Uddhav Thackeray l राजू पेडणेकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार :
मात्र वर्सोवा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून हरून खान यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आता राजू पेडणेकर हे सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
माजी नगरसेवक राजू पेडणेकर हे तीन वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, मात्र आता ते वर्सोवातून पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते आता अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत.
News Title – Raju pednekar aginst on uddhav thackeray
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर
“पोरं तरी कशी झाली…”; जयश्री थोरातांबद्दल भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
महायुतीतील सर्वजण मिळून अमित ठाकरेंना विजयी करू; भाजप नेत्याचं मोठं विधान
अजित पवारांच्या ‘या’ नेत्यापासून भाजप दोन हात लांब राहणार!
फडणवीसांची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क