राजू शेट्टी नव्हे सदाभाऊ खोत यांच्याशी अमित शहा चर्चा करणार?

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी अमित शहांच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नसून अमित शहांच्या भेटीसाठी भाजपनेच त्यांना वगळल्याची माहिती आहे. भाजपच्या मूळ नियोजनात स्वाभिमानीकडून सदाभाऊ खोत अमित शहांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय.

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अमित शहा राज्यातील भाजपच्या घटकपक्षांशी चर्चा करणार आहे. रासप, आरपीआय आणि शिवसंग्रामचे नेते या चर्चेत सहभागी होणार आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या