खासदार राजू शेट्टी कोल्हापूरहून मुंबईला पायी चालत जाणार

राजू शेट्टी
खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. येत्या २२ मे पासून खासदार राजू शेट्टी कोल्हापूरहून मुंबईला पायी जाऊन राज्यपालांना आपल्या मागण्याचं निवेदन देणार आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यावेळी राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली. यावेळी उपस्थित कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या