डोकी फोडल्याशिवाय आणि तुकडे पाडल्याशिवाय न्याय मिळत नाही!

राजू शेट्टी
खासदार राजू शेट्टी

सातारा | डोकी फोडल्याशिवाय, तुकडे पाडल्याशिवाय न्याय मिळतच नाही, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केलं आहे. ते कराडमधील शेतकरी मेेळाव्यात पत्रकारांशी बोलत होते.

जेव्हा जेव्हा कायद्याचा गैरवापर करून शेतकरी चळवळ दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेव्हा तेव्हा बळीराजाने राज्यकर्त्यांना मातीत घातलेले आहे, असं शेट्टींनी म्हटलं. 

गुन्हे दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांची मुले थांबायची नाहीत, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनाचे समर्थन केलं. 

दरम्यान, या सरकार पेक्षा इंग्रज बरे होते. ते निदान आंदोलकांशी सभ्यतेने वागत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपचे 6 खासदार डेंजर झोनमध्ये; पत्ता कट होण्याची शक्यता?

-#MeToo | …तर मी महिलांच्या पाठिंशी खंबीरपणे उभा असेन- अमिताभ बच्चन

-#MeToo | ‘या’ प्रसिद्ध कर्णधारावर एअर होस्टेसचा विनयभंगाचा आरोप

-बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते!

-मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही!