मुंबई | परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सोयाबीन, भातशेतीला चांगलाच फटका बसला होता. आधी बोगस बियाणांमुळे शेतकरी तोट्यात गेला त्यानंतर दुबार पेरणी केल्यावर हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिसकावून घेतला होता. याच पार्श्वभूमीवर, वा! असा तत्पर चौकीदार मिळायला नशिब लागत, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालं तेव्हा राज्य सरकारने केंद्राला परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक काही आलं नाही. मात्र दोन महिन्यांनी केंद्राचं पथक पीकाची पाहणी करण्यासाठी आलं आहे यावरूनच शेट्टींनी जोरदार टीका केली आहे.
दोन महिने सहा दिवसांनी अतिवृष्टीचे झालेले नुकसान पाहण्यास केंद्रीय पथक आलं आहे. आता शिवारात जाऊन काय बघणार?, असा सवाल राजू शेट्टींनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
शेतकऱ्यांनी खासगी सावकराकडून पैसे घेऊन जमीनीची साफ सफाई करून हरभरा ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल “फसल तो बहुत अच्छी है “ इनको मदत करने कि जरूरत नही, असं म्हणत शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
वा ! असा तत्पर चौकीदार मिळायला नशिब लागत.@ANI
— Raju Shetti (@rajushetti) December 21, 2020
थोडक्यात बातम्या-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन
भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही- चंद्रकांत पाटील
युकेमधून येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
ब्रिटनमध्ये नवा कोरोनाचा विषाणू; पण भारत सरकार म्हटतंय ‘नो टेन्शन’!
ममता बॅनर्जींचा भाजपवर सर्जिकल स्ट्राईक; भाजप खासदाराच्या पत्नीचा तृणमूलमध्ये प्रवेश