Top News आरोग्य कोरोना राजकारण

राजू शेट्टी यांची कोरोनावर मात, पुण्यातील रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

राजू शेट्टी

पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी कोरोनामुक्त झाले होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण होती.

सोशल मिडीयाद्वारे राजू शेट्टी यांनी स्वतः त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. यासंदर्भात त्यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट केला होता. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.

कोरोनाचा अहवाल पॉसिटीव्ह आल्यानंतर प्रथम ते होम क्वारंटाईन होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर ते कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

बुधवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजू शेट्टी होम क्वारंटाईन होणार आहे. त्यांच्या शिरोळच्या घरी ते होम क्वांरटाईन होणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या