महाराष्ट्र मुंबई

आळशी सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा कशाला?- राजू शेट्टी

मुंबई | ठाकरे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे.  सरकारच्या या निर्णयाचे कौतुक होत असले तरी काहींनी यावर आक्षेप घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका केली आहे.

राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा कामाचा दिवस कमी केल्याने सरकारवर कामाचा बोझा वाढेल आणि कामं रेंगाळत राहतील, असं म्हणत शेट्टींनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

पाच दिवसांचा आठवडा करुन 45 मिनीटांनी वेळ वाढवण्यात येणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती अशी आहे की, लंच ब्रेकमध्ये कर्मचारी पाय मोकळे करायला जातो म्हणून 2-2 तास कामावर येत नाही. शिवाय चहा पिण्यासाठी गेलेले कर्मचारी कामावर लवकर परतत नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. काम 5 दिवसांचं मग पगार सात दिवसांचा का? असा सवाल त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत”

शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून हटवल्याने संभाजीराजे संतापले

महत्वाच्या बातम्या-

सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्य टाळा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची कारणं वेबसाईटवर टाका- सर्वोच्च न्यायालय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या