महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

मुंबई | शेती हा व्यवसाय तोट्याचा बनलाय, पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनला असून मुलीचे वडील शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देण्यास नकार देत आहेत. या परिस्थितीविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे.

राजू शेट्टी शेतकरी मुलांच्या लग्नासाठी पुढाकार घेणार आहेत. शेतकरी कुटुंबांच्या घरी जाऊन क्षणिक आणि आभासी सुखाच्या मागे लागू नका, असा सल्ला ते देणार आहेत. शेती कष्टाची आहे, पण कष्ट घेतल्यास शेती शाश्वत सुख देऊ शकते, याची जाण ते शेतकऱ्यांना करुन देणार आहेत.

शेतीमध्ये गाढवासारखं राबावं लागतं हे खरं आहे. थोडे कष्ट पडतील मात्र दोघांनी मिळून काम केल्यास ते पुढे जाऊ शकतात. काही जोडधंदा करुन शेतकरी जोडपं सुखाने राहू शकतात, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

आभासी आणि क्षणिक सुखामागे धावू नका, असा सल्ला राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या लेकींना दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने उदयनराजे आक्रमक

हिंमत असेल तर शिवसेनेने एकट्याने विधानसभा लढवावी- चंद्रकांत पाटील

महत्वाच्या बातम्या-

आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?- सय्यदभाई

आळशी सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा कशाला?- राजू शेट्टी

‘पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा’; काँग्रेस नेत्यानंच सरकारला सुनावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या