असशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही!

पुणे | असशील तू शिवसेनेचा आमदार. माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायच नाही, असा दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना दिला आहे.

शेट्टींनी साखर आयुक्तांची भेट घेऊन एफआरपीनुसार दर न दिलेल्या कारखान्यांवर कारवाईची मागणी केली. त्यात तानाजी सावंत यांच्या कारखान्यांचा समावेश होता.

आयुक्तांनी एफआरपीसाठी कारखान्याला फोन केला. त्यानंतर सावंत यांनीच आयुक्तांना फोन केला. त्यांनी मात्र तो शेट्टींकडे दिला. शेट्टींनी सावंतांना जाब विचारला. त्यावर माझ्याकडे 8 कारखाने आहेत. प्रत्येकाचा हिशेब ठेवू का?, असं सावंत यांनी म्हटलं. 

दरम्यान, शेट्टींनी चिडून सावंतांना दम भरला. त्यानंतर सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द होईपर्यंत शेट्टींनी आयुक्तांची केबिन सोडली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-राजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही!

-#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी

-गोव्यात गोमांस बंदी करा, मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल!

-नाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी

-स्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…