महाराष्ट्र मुंबई

…हे पाहून अंगी बारा हत्तीचं बळ आलंय- राजू शेट्टी

मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही शांततेच्या मार्गाने बंद ठेवला, आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नाही. सामान्य माणसं, बुद्धिवादी लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, हे पाहून उर भरून आला आहे. हे पाहताना अंगात बारा हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतंय, असं राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे कृषी विधेयकांची होळी करत विधेयके तातडीने रद्द करण्याची मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध  विषांवर भाष्य केलं.

सरकारने शेतकरी आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामान्य माणूस खवळला आहे. सरकारने प्रतिष्ठा पणाला लावू नये, या देशात शेतकऱ्यांपेक्षा कोणीही मोठा नाही, असंही राजू शेट्टींनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून शरद पवार संतापले अन् चालू पत्रकार परिषदेतून माझी चूक झाली असं म्हणत गेले निघून!

ज्या देशातील शेतकरी दु:खी आहे, तो देश कधीच प्रगती करु शकत नाही- उर्मिला मातोंडकर

वाढदिवसाचा केक कापून तरुण झाला फरार; पोलिसांनी मित्रालाच ठोकल्या बेड्या!

नववीतील विद्यार्थिनीवर ८ जणांकडून बलात्कार; १३ दिवस सुरु होता धक्कादायक प्रकार

“शेतीतलं शिवसेनेला काय कळतं?, शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही ते फक्त…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या