कोल्हापूर महाराष्ट्र

…तर अमित शहांची देखील काॅलर धरु; राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर | दिल्लीत सध्या केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी धडक मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने सुरू असतानाच अचानक एका गाडीतून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा आणण्यात आला. या पुतळ्याचे कार्यकर्त्यांनी दहन करू नये यासाठी पोलिसांनी तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. झटापट सुरू असतानाच अचानक एका पोलीस अधिकाऱ्याने शेट्टी यांच्या कॉलरला हात घातला.

राजू शेट्टी यांची कॉलर धरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. नंतर शेट्टींनी त्यांना शांत केलं.

दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे असेच सुरू राहिले तर आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्या कॉलरला हात लावण्यास मागेपुढे पाहणार नाही. दोन दिवसात जर केंद्राने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या-

“भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत”

“…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू”

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर!

व्हाईटवॉश टळला! तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 13 रन्सने मात

लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या- बाळा नांदगावकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या