Top News

“शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शहा कोण आहेत?”

कोल्हापूर | शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या चालू असलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठींबा देत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे फक्त पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन नाही तर सर्व देशातील शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आम्ही न्याय मागत आहोत मग पोलीस बळाचा वापर का?, शेतकरी काय अतिरेकी आहेत का?, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही शेतकऱ्याला आपली बाजू मांडू दिली नाही. गेल्या सहा महिन्यात पंतप्रधानांना अनेक पत्र लिहिलीत मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं शेट्टी म्हणाले.

दरम्यान, आमच्या भावना दिल्लीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात दिल्लीपेक्षा मोठं आंदोलन होईल. दिल्लीतील शेतकऱ्यांचं समाधान नाही झालं तर एकाही केंद्रीय मंत्र्याला फिरू देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

कदाचित भाजपला माझ्यापासून भीती वाटत असेल- आदित्य ठाकरे

रश्मी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र- उदयनराजे भोसले

“अनैसर्गिक गोष्ट फार काळ टिकत नाही, महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहातून पडणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या