Top News महाराष्ट्र मुंबई

“सत्तासुंदरी हातची गेल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदाससारखी”

मुंबई | राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली होती. शेलारांच्या या टीकेला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सत्ता सुंदरी हातातून निसटल्याने आशिष शेलार आणि त्यांच्या टोळक्याची अवस्था देवदाससारखी झाली असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

सत्तरच्या दशकात आलेल्या पिंजरा या चित्रपटातील आदर्श शिक्षकाला एका मोहापायी तमाशाच्या फडात तुणतुण घेऊन उभं रहाव लागतं. तशी अवस्था राजू शेट्टींची झाली असल्याचं शेलार यांनी म्हटलं  होतं.

दरम्यान, सांगलीमध्ये किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ झाला आहे. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख इ. नेत्यांची उपस्थिती होती.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीपेक्षा बेवड्यांची सोय करण्यामध्ये सरकारला जास्त इंटरेस्ट

राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडी

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘अशा’प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते; अनिल परब यांनी मनसेवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या