Top News कोल्हापूर महाराष्ट्र

“मोदी देतील तो दर शेतकऱ्यांनी घ्यावा हे फडणवीसांनी बांधावर जाऊन सांगावं”

कोल्हापूर | लॉकडाऊनच्या काळामध्ये अंबानी-अदानी या उद्योगपतींना मोठा तोटा झाला आहे. तो भरून काढण्यासाठी त्यांना अन्नधान्याच्या बाजारामध्ये केंद्र शासन उतरवत असल्याचं स्वाभीमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये ते बोलत होते.

मोठे भांडवलदार मागतील त्या दराने धान्य शेतकऱ्यांना शेतमाल शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देईल तो दर शेतकऱ्यांनी शेतमालासाठी घ्यावा असं देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन सांगावं असं आव्हान फडणवीसांना राजू शेट्टी यांनी दिलं आहे.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या ‘किसान आत्मनिर्भर यात्रे’च्या पार्श्वभूमीवर ‘कोणीही आमच्या बालेकिल्ल्यात आले तरी काही फरक पडणार नाही, असा टोलाही शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला.

दरम्यान, सरकारी किंवा खासगी साखर कारखान्यांनी पंधरा दिवसात रक्कम दिली नाही तर साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याची तरतूद आहे. असाच कायदा अन्य शेतमालासाठी केंद्र शासन का लागू करू शकत नाही, असा सवलाही शेट्टींनी यावेळी केला.

थोडक्यात बातम्या-

“तुमची ती नाईट लाईफ आणि जनतेची पार्टी करो ना!”

काँग्रेसला मोठा धक्का! 16 नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवत पवारांच्या उपस्थितीत हाती बांधल घड्याळ

“आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे”

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

“उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या