बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

कोल्हापूर | शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यभर ‘जागर एफआरपी’ आंदोलन करणार असल्याची घोषणा केेली आहे. त्यासोबतच शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकारला टोला हाणला आहे.

पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दुसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, अशा शब्दात राजु शेट्टींनी इशारा दिला आहे.

भाजपनेच एफआरपीचे तुकडे करण्याचं अनौरस बाळ जन्माला घातलंय. आम्ही ते खपवून घेणार नाही. आज पुण्यात भाजपच एक रकमी एफआरपीसाठी आंदोलन झालं. पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल. स्वाभीमानी झोपली आहे असा गैरसमज कोणी करू नये, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कधी नव्हे ते साखर उद्योगाला चांगलं वातावरण आहे. ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीचा निर्णय प्रोत्साहन देणारा आहे. आता कारखानादारांना कोणतीही ओरड करता येणार नाही. त्यांनी आता कोणतीही सबब सांगू नये, असंही शेट्टी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘उसूलो पर आंच आए तो टकराना जरुरी है; राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी सोडलं मौन!

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्राव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More