बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रानडे इन्स्टिट्यूटवर दरोडा घालण्याचा प्रयत्न सुरुय, आम्ही तो हाणून पाडू”

मुंबई | पत्रकारितेच्या शिक्षणासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटवरून वाद पेटलेला दिसत आहे. या इन्स्टिट्यूटमधील अनेक विद्यार्थी माध्यमांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर करण्याबाबत त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच स्थलांतरांच्या विरोधाला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनीही पाठींबा दर्शवला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रानडे इन्स्टिट्यूट मर्ज करण्यामागे धनदांडग्यांचे षड्यंत्र आहे.मोक्याची जागा ताब्यात घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे. माझी सरकारला विनंती आहे. ऐतिहासिक वारसा असलेला हा विभाग हलवू नयेत. या इमरातीमध्ये पत्रकारिता क्षेत्रातील वेगवेगळे अभ्यासक्रम चालू करत रानडे इन्स्टिट्यूट बळकट करावी, अंस राजु शेट्टी यांनी म्हटलं आहे.

रानडे इन्स्टिट्यूटची कोट्यवधी रुपयांची जागा ताब्यात घेण्याचे कारस्थान सुरू आहे. हा मोठा दरोडा आहे.सुशिक्षितपणाचा बुरखा पांघरूण धनदांडगे लोक ही जागा ताब्यात घेण्यासाठी सरसावले आहेत. आम्ही हा प्रयत्न हाणून पाडणार आहोत आणि रानडे इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या बचाव कृती समितीच्या आम्ही पाठीशी असल्याचं राजु शेट्टी म्हणाले.

दरम्यान, अनेक प्रसिद्ध नामांकित पत्रकारांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. रानडे इन्स्टिट्यूटच्या पत्रकारितेच्या शिक्षणाबाबत एक दर्जा आहे. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटचं स्थलांतर होतं की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर बोलताना स्थलांतर होणार नसल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ न्यूड फोटोमुळे राधिका आपटे सोशल मीडियावर ट्रोल!

राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ; आता आणखी एक टीम करणार चौकशी

राज्यातला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला; मृत्यूच्या संख्येत होेतेय वाढ

पुणे श्रमिक पत्रकार संघाचा रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विरोध

‘…हे कदाचित राज ठाकरे यांना माहित नसावं’; राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; इतक्या पदांसाठी भरती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More