बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर ही विधानपरिषदेची ब्याद मला नकोच- राजू शेट्टी

मुंबई | अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर पक्षातील काही नेते नाराज आहेत. जालंदर पाटील आणि सावकार मदनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. यावर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाभिमानी’ हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ उभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?- संजय राऊत

“नेहरूंचं परराष्ट्र धोरण चुकलं म्हणून टाळ्या मिळतील पण सैनिकांचं बलिदान थांबवण्याची जबाबदारी मोदींचीच”

महत्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा हाहाकार, रूग्णसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ

“उद्धव, मुलायम, धिरूभाई… घराणेशाही कुठे नाही?”

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसाठी मंत्री हसन मुश्रीफांची खुशखबर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More