‘घ्या की जुळवून’ला राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांचा प्रतिसाद नाही!

मुंबई | मंत्रालयात खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकमेकांसमोर आले होते, मात्र त्यांनी बोलणं तर लांबच एकमेकांकडे पाहणंही पसंत केलं नाही.

मंत्रायलात राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. त्याचवेळी सदाभाऊ खोत खाली आले आणि अधिकाऱ्यांसोबत गाडीची वाट पाहू लागले. अशातच भाजप नेते पाशा पटेल तिथे आले आणि त्यांनी दोघांनाही ‘घ्या की मिटवून’ अशी साद दिली. मात्र दोन्ही नेत्यांनी पाशा पटेल यांना प्रतिसाद दिला नाही. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या