मुंबई | भाजपच्या विरोधात महाराष्ट्रात तयार झालेल्या आघाडीत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार की नाहीत? याबाबत अनिश्चितता आहे. त्यातच आता राजू शेट्टींनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
हातकणंगलेसोबतच राजू शेट्टींना विदर्भातील दोन जागा हव्या आहेत. बुलडाणा आणि वर्ध्याच्या जागेची मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला सोडली आहे. मात्र या दोन जागांबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
राजू शेट्टी यांनी यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा दिलाय. अन्यथा राज्यात चौथी आघाडी तयार करु, असं राजू शेट्टींनी म्हटल्याचं कळतंय.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून एका चहावाल्यालाही मोदी सरकारनं दिला पद्मश्री पुरस्कार!
–माजी खासदाराची नात आणि आमदार कन्येला युवक काँग्रेसनं केलं सरचिटणीस
-राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर
–कुलदीपनं असे चेंडू टाकले की न्युझिलंडचे खेळाडू त्याच्या तालावर नाचले!
–‘या’ मंत्री वाचू शकल्या नाहीत मुख्यमंत्र्यांचा संदेश, म्हणाल्या यापुढे कलेक्टर वाचतील