महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

“चंद्रकांतदादा विखे, पिचड आणि राणे यांना काय तुम्ही दत्तक घेतलंय काय?”

मुंबई |  अस्थिर परिस्थितीत धोका टाळण्यासाठी विविध पक्षांनी आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावर आमदार फोडणं ही भाजपची संस्कृती नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

आमदार फोडणं ही भाजपची संस्कृती नाही मग राधाकृष्ण विखे, वैभव पिचड, नारायण राणे व अन्य काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा देऊन पक्षात दत्तक घेतले आहेत काय?  ते काय पक्षाचा पाळणा हालत नाही म्हणून काय? असे सवाल त्यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले आहेत.

चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य खोटं आहे असं म्हणत दादा किमान कार्तिकी एकादशी दिवशी तरी विठ्ठलासमोर खरं बोला, असा सल्ला राजू शेट्टी यांनी पाटील यांना दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तास्थापनेचं अजूनही भिजतं घोंगडं आहे. सेना-भाजपचं एकमत होताना दिसत नाही.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या