बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजितदादा तुम्हीच राज्य चालवताय, मुख्यमंत्री कधीतरी दिसतात”

पुणे | राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज असल्याची चर्चा देखील राज्यात रंगली आहे.

स्वाभिमानीे पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या विविध ठिकाणी दौरा करत आहेत. बारामती दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शेट्टी एकाच व्यासपीठावर होते. तेव्हा राजू शेट्टींनी अजित पवारांची स्तुती करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

अजितदादा तुम्हीच राज्य चालवताय, मुख्यमंत्री कधीतरी दिसतात, असं म्हणत शेट्टींनी अजित पवारांची स्तुती केली आहे. परिणामी स्वाभिमानी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय तुर्तास तरी लांबल्याची चर्चा आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची स्थापना मुळातच शेतकऱ्यांच्या न्यायासाठी झाल्याची आठवण यावेळी राजू शेट्टींनी अजित पवारांना करून दिली.

थोडक्यात बातम्या – 

राजमौलींच्या ‘RRR’ची बॉक्स ऑफिसवर जादू, पहिल्याच दिवशी मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड

“संजय राऊतांचं ‘हे’ वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे”

“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं, कोणाचीही नोकरी जाणार नाही”

“कोरोनापेक्षा सध्या सुरू असलेलं राजकारण भयंकर”

महागाईचा फटका, पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More