बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचं नेमकं धोरण काय? कोंबड्या वाचवणं की माणसं”

नाशिक | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी नुकताच वादग्रस्त कृषी कायदे ( Agriculture Laws ) मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही शेतकऱ्यांचा केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवरचा रोष कमी झालेला नाही. मोदींनी हा निर्णय आधीच घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळल्या असत्या, अशी टीका अनेक नेत्यांनी केली आहे. आता माजी खासदार राजू शेट्टी ( EX MP Raju Shetty ) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. ते म्हणाले, ‘सोयाबीनला चांगला भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या. त्यांचा जीव वाचला असता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदीचं धोरण म्हणजे कोंबड्या वाचविण्यासाठी माणसं मेली तरी बेहत्तर, असा टोला लगावत सोयाबीनचे दर 11 हजारावरून 4 हजारावर आणले,’ अशी टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, दबावामुळे सरकार कसे झुकते याचे उदाहरण म्हणजे दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यानीं वर्षभर आंदोलन केलं. त्याचा परिणाम म्हणून सरकारला इच्छा नसताना कृषी कायदे मागे घ्यावे लागले. नरेंद्र मोदींना जनतेपुढे झुकावे लागले. याला म्हणतात दबाब, अशा दबावाची गरज आहे. असं म्हणत त्यांनी शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, राजू शेट्टी करंजगाव येथे झालेल्या उल- द्राक्ष परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी कांदा निर्यातीवर बंदी घालणे, कृषी कायदे मागे घेणे, सोयाबीणला भाव न देणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी यावेळी सरकारला सरकारचं नेमकं धोरण काय आहे? कोंबड्या वाचवणं, की माणसं वाचवणं? असा खोचक सवाल देखील विचारला आहे.

थोडक्यात  बातम्या-

“मी आता आई होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”

“तुला मराठी ठाऊक नाही का? हा महाराष्ट्र आहे…”, राज्यपाल कोश्यारी संतापले

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

“2024 ला महाविकास आघाडीचंच माॅडेल, तिन्ही पक्ष एकत्र लढले तर…”

राज कुंद्राला मोठा झटका; अश्लील व्हिडीओ प्रकरणी पुन्हा अडचणीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More