पुणे | मोदी सरकारने देशात आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतलाय. या कृषी कायद्यांचा विरोध म्हणून राजू शेट्टी मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.
पुण्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मोदी सरकारने हे कायदे मुकेश अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींसाठी बनवलेत. म्हणूनच 22 डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार, असल्याचं शेट्टी यांनी सांगितलंय.
राजू शेट्टी म्हणाले, “वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफिसपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणारे. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू देखील सहभागी होणार आहेत. शिवाय यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही सहभागी व्हावं.”
“केंद्रातील सरकारला जर शेतकऱ्यांना खरंच काही द्यायचं असेल तर हमीभाव द्यावा. पण त्यांच्यावर नको असलेले कायदे लादू नका,” असंही शेट्टी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
आरे वनाविरोधी असलेल्या लोकांना उकळ्या फुटण्याचं कारण नाही- जयंत पाटील
“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”
पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!
कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”