सत्ता आणि सदाभाऊंबद्दल ‘स्वाभिमानी’चं तळ्यात-मळ्यात

पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला २५ जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे, त्यानंतर सरकारमध्ये रहायचं की नाही यासंदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यात पार पडलेल्या स्वाभमानीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. 

दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्यावर निर्णय घेण्यासाठी पक्षाने एका समितीची स्थापना केलीय. १५ जुलैपर्यंत या समितीपुढे सदाभाऊंना आपलं म्हणणं मांडण्याची संधी असणार आहे. त्यानंतर सदाभाऊंसंदर्भातला निर्णय घेणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या