महाराष्ट्र मुंबई

….म्हणून सदाभाऊ खोत पिसाळल्यासारखे वागत आहेत- राजू शेट्टी

मुंबई | सदाभाऊ खोत हे नैराश्येतून भ्रमिष्टासारखे आरोप करतायत, आंदोलन फसल्यामुळे ते पिसाळल्यासारखे वागत असल्याचं म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिलंय.

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींवर जहरी टीका केली होती. “राजू शेट्टी भंपक माणूस आहे. गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे. जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहेत, असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.

राजू शेट्टी यांनी भीक मागून आमदारकी मिळते का बघावी, राजू शेट्टी यांच्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो. त्यामुळे त्यांचे सर्व कारनामे मला माहिती आहेत. यांच्यासारखं 300 एकर जमीन कुठं घेऊन ठेवल्या नाहीत. पेट्रोल पंप कार्यकर्त्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या नाहीत, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलं असून सदाभाऊ खोत हे नैराश्येतून भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत, आंदोलन फसल्यामुळे ते पिसाळल्यासारखे वागत असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्याॉ

‘साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

‘सुशांत संशयास्पद औषधं घेत होता’, जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या