मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात आघाडी होण्याआधीच काडीमोड होण्याची शक्यता आहे. कारण स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी छोट्या पक्षांना एकत्र घेऊन चौथी आघाडी बांधण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे.
स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपाचं गणित जुळलं नाही. त्यामुळे राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवाय आघाडी उभारण्याच्या तयारीत आहेत.
उसाच्या थकीत एफआरपीचा मुद्दा, कर्जमुक्ती, दीडपट हमीभावाचे विधेयक यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्याला गृहीत धरत असल्याची भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे.
दरम्यान, इतर पक्षातील तिकिट न मिळालेल्या बंडखोर नेत्यांना उमेदवारी देण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना विचार करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कांद्याच्या भावासाठी आता शिवसैनिक-शेतकरी रस्त्यावर; महामार्ग रोखून धरला…
-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ‘यांची’ नावं सर्वाधिक चर्चेत!
–युती व्हावी म्हणून गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना
-अजित पवारांनी सांगितली 12 कोटींच्या रेड्याची गोष्ट, उपस्थितांमध्ये एकच हशा…
-2017-18 मध्ये बेरोजगारीच्या दरानं 45 वर्षांचा विक्रम मोडला- बिझनेस स्टँडर्ड