मुंबई | महाविकास आघाडी किमान धर्माच्या नावावर भेदभाव तरी करीत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणजे दगडापेक्षा विट मऊ एवढंच, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.
जो राजकीय पक्ष विरोधात असतो, तो नेहमी शेतकरी हिताच्या गप्पा मारतो. पण जेव्हा तो सत्तेत येतो तेव्हा शेतकरी हित विसरुन जातो. तसेच सत्तेतून पायउतार झालेला राजकीय पक्षही शेतकऱ्यांची बाजू घेऊ लागतो, असं म्हणत शेट्टी यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीने शेतकरी कर्जमाफी केली. पण सरकारची कर्जमाफी तकलादू आणि बिनकामाची आहे. भाजप असो किंवा महाविकास आघाडी शेतकऱ्यांसाठी काही करत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी स्वत: मालामाल झाल्या आहेत, हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
…त्यांनी आपले आक्रमण अजून पाहिलेले नाही- राधाकृष्ण विखे पाटील
उद्धव ठाकरे-मोदी भेटीनंतर ‘वर्षा’वर तातडीची बैठक… शरद पवार, उद्धव ठाकरे अजित पवार हजर
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही- उदयनराजे भोसले
“ट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी उभी राहिली तर 1 कोटी लोक नक्की जमा होतील”
केवळ शिवसेनेने नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा; काँग्रेस खासदाराचा घरचा आहेर
Comments are closed.