बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धन्यवाद पवारसाहेब, आपण दिलेला शब्द पाळला…!”

बारामती | राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणून जावं, अशी राष्ट्रवादीची इच्छा होती तसा प्रस्ताव देखील राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांना दिला होता. तो प्रस्ताव राजू शेट्टी यांनी स्विकारला आहे. आता राजू शेट्टी यांची विधानपरिषदेवर आमदार वर्णी लागणार आहे. ही आता केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. त्यानंतर शेट्टी यांनी ट्विट करून पवारांचे आभार मानले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीवेळी स्वाभिमानीला राष्ट्रवादीने एक विधानपरिषदेची जागा देण्याचे ठरले होते. तो शब्द पाळण्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मान्य केले. राज्यपालाच्या कोट्यातून एक जागा स्वाभिमानीस शिफारस करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शब्द पाळला. धन्यवाद…, असं ट्विट राजू शेट्टी यांनी केलं आहे.

 

 

आज दुपारी राजू शेट्टी आणि शरद पवार यांच्यात बारामतीमधल्या गोविंदबागेत दीर्घ बैठक पार पडली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. या बैठकीत कृषी, उद्योग यांसहित राजकारणावर अतिशय मनमोकळी चर्चा झाली. यानंतर खास फोटोसेशन पार पडलं.

राजू शेट्टी 2004 मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. मात्र 2019 च्या निव़डणुकीत शिवसेनेचे तरूण तडफदार उमेदवार धैर्यशील माने यांनी शेट्टींना पराभूत करून सगळ्यांनाच लक्ष वेधून घेतलं.

2019 च्या लोकसभेला पराभूत झाल्यापासून शेट्टी पक्षीय संघटनेकडे लक्ष देत होते. जून महिन्यात राज्यपाल नियुक्त जागा रिक्त होत असल्याने त्यांनी शरद पवार यांना त्यांच्या आश्वसनाची आठवण करून देणरा मेल पाठवला होता. त्यानुसार आज शरद पवार-राजू शेट्टी यांच्या बैठक पार पडली. आणि पवारांच्या मनासारखा निर्णय घेऊन शेट्टींनी पवारांच्या मताचा आदर राखला.

ट्रेंडिंग बातम्या-

“…हे म्हणजे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम आहे”

“खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मॅनेजर दिल्लीत बसले आहेत”

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रवीना टंडनचा बॉलिवूडबाबत मोठा खुलासा

शरद पवार-राजू शेट्टींच्या उपस्थितीत बारामतीत बैठक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सध्याच्या घडीला मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही- नितीन गडकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More