मुंबई | मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दर दबावात आहेत. सध्या राज्यातील प्रमुख बाजारपेठेत कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल 400 ते 1000 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.
कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) हैराण आहेत. सध्या लेट खरीप कांद्याची आवक बाजारात वाढली आहे. मात्र कांद्याला सध्या कवडीमोल दर मिळत आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं, असं सांगत शेट्टींनी सरकारवर निशाणा साधलाय.
राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले ते बघा. निर्लज्ज व्यापार्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकर्यांना सांगतो 15 दिवसाने हा चेक वटेल, असं ट्विट राजू शेट्टी यांनी केलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला असल्याची माहिती माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
महत्त्वाच्या बातम्या-