बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिघडलेल्या अभिनेत्यांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात यावर चर्चा सुरूये पण इकडे शेतकरी…”

सोलापूर | दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलणं गरजेचं असताना ते भलत्याच कामात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये गुंडाप्रमाणे टोळीयुद्ध सुरू असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

गेल्या 12 दिवसांपासून सोलापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिलासंदर्भात काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांवरही ताशेरे ओढलेत.

बिघडलेल्या अभिनेत्यांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात आणि यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण इथे अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी, महापुरात बुडालेला शेतकरी, उस बिल न मिळाल्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि हे दुर्दैवी आहे, अशी घणाघाती टीका राजू शेट्टींनी केली आहे.

ऐन दिवाळीच्या काळात शेतकरी रस्त्यावर उतरून बेवारशासारखं आंदोलन करत आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, ही शरमेची बाब आहे. आणि इकडे गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जाते. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात राजकिय टोळीयुद्ध सुरू आहे, असा आरोपही राजू शेट्टींनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंच्या मेहुणीवर गंभीर आरोप, म्हणाले…

पंतप्रधान झाल्यावर मी सर्वात पहिले ‘हे’ काम करणार- राहुल गांधी

अहमदनगरमधील ‘त्या’ घटनेवरून संजय राऊत सरकारवर भडकले, म्हणतात….

जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले नरेंद्र मोदी; जो बायडन यांनाही मागे टाकलं

“राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More