पुणे | शेतकरी हा सध्याच्या काळात महत्वाचा प्रश्न आहे. कारण, गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने थैमाण घातले होते. तेव्हा शेत पाण्याखाली गेली होती. तसेच शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. पण राज्यात गेला महिनाभर सत्तांतराचे वारे वहात असल्याने शेतकऱ्यांकडे पहायला कोणाला वेळ नाही. त्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे.
ऊसाला पाणी नाही, महापूरग्रस्तांना तोकडी मदत, वीजेचा लपंडाव सुरु आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. इंधनाच्या किंमती वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षांचा सत्तांतराचा खेळ सुरु आहे तर, विरोधी पक्ष ईडी, आयकर आणि भोंग्यांच्यापुढे जायला तयार नाहीत, असं म्हणत त्यांनी राज्याच्या राजकारणावर टीका केली.
महाविकास आघाडी सरकारने (MVA) भूमीग्रहण कायद्यात मोडतोड केली. ऊस हे देशातील एकमेव हमीभाव देणारे पीक असून असाच कायदा जर इतर पीकांना करता आला असता तर, शेतकरी इतर पीकांकडे वळले असते. शरद पवार (Sharad Pawar) हे 10 वर्षे कृषी मंत्री होते. त्यांनी हा निर्णय घेतला नाही. ऊस उत्पादकांच्या कामावर आणि घामावर शरद पवारांचे पुतण्या आणि नातवांचे कारखाने निघाले, असा खळबळजनक आरोप शेट्टींनी यावेळी पवार कुटुंंबीयांवर केला.
केंद्र सरकराचे बहुचर्चित तीन कृषी कायद्यांवर (Three Agriculture Laws) सुद्धा राजू शेट्टी यांनी भाष्य केले. 800 शेतकऱ्यांचा बळी घेऊन केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. त्यांच्या चूकीच्या धोरणामुळे रासायनिक खतांचे भाव वाढले आणि त्याचा दुष्परिणाम शेतकरी आणि त्यांच्या उत्पादनावर झाला, असं ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या –
‘बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच’; संजय राऊत आक्रमक
राज्याला पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती”
मंत्र्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले
झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!
Comments are closed.