बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रचाराचा असाही फंडा!, राजू शेट्टींनी वापरली ‘ही’ भन्नाट आयडिया

पंढपूर | पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. भाजप व राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं आता पंढरपूरात तिरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. यातच गुढीपाडव्या दिवशी राजु शेट्टींचं नवं रूप पंढरपूरकरांना  पाहायला मिळालं. 

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत सचिन शिंदेच्या प्रचारासाठी स्वतः राजु शेट्टी गेले आठवडाभर मतदारसंघात तळ ठोकुन आहेत. राजु शेट्टी स्वतः मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्ते देखील उत्साहात आहेत.

आज राजु शेट्टींनी भल्या पहाटे पंढरपुरातील पालखी मार्गावरील जाॅगिंग ट्रॅक गाठला. सकाळी सकाळी येणाऱ्या प्रत्येकाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा व सोबत मतदानाची पत्रिका देवुन ते मतदारांना मतदानाचे आवाहन करत होते. थेट सकाळीच मतदारांशी संवाद साधल्याने त्यांचा हा प्रचार आज संपुर्ण पंढरपूर शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या प्रचाराला लोक प्रतिसाद देताना दिसत आहे.

दरम्यान, सचिन शिंदे यांना गावोगावच्या प्रचारसभांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवाय उमेदवार सचिन शिंदेंची तरूणाईमध्ये देखील मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. त्यामुळे सचिन शिंदे यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देतील अशी चिन्हं आहेत.

पाहा फोटो-

थोडक्यात बातम्या-

भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी अन्…

चेपॅाकवर मुंबईच्या गोलंदाजांसमोर कोलकाताच्या फलंदाजांची परीक्षा

बंगाल निवडणूकीला नवं वळण; ममतांवर निवडणूक आयोगाची कारवाई

आता RT-PCR चाचणीत सापडेना कोरोना विषाणू; नव्या कोरोना स्ट्रेननं डाॅक्टराची वाढवली चिंता

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More