बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

कोल्हापूर | माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे बऱ्याच दिवसांपासून आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच आता राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी यावेळी  केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर रोष व्यक्त करत “महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही? याचा लवकरच निर्णय घेेऊ”, असा दावा केला आहे. ते जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या उस परिषदेत बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी उस परिषद मंगळवारी जयसिंगपूर येथे पार पडली.

यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारकडे गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल 3300 रूपये देण्याची मागणी केली आहे. शिवाय एफआरपीची रक्कम पहिल्या टप्प्यात न दिल्यास ऐन हंगामात कारखाने बंद पाडू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

यासोबतच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “महाविकास आघाडीने विश्वासघात केला असून महाविकास आघाडीत राहायचं की, नाही याबाबत लवकरच निर्णय घेऊ” असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलंच सुनावलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही! तु मोठी झाली का पाहायचं म्हणत जन्मदात्या बापाने…”

‘या’ कारणामुळे शिवसेना खासदार भावना गवळी दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

सुयश टिळक अन् आयुषी भावेच्या हळदीचे सोनेरी क्षण, पाहा फोटो

राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आता ‘या’ वेळेपर्यंत राहणार खुली; वाचा काय आहे नवी नियमावली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More