बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दाखवून देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजेच गोकुळची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे.तसेच महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये असलो तरी गोकुळ निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दाखवून देऊ, असा इशाराच सरकारला दिला आहे. शनिवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना अनेक राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूध संघाच्या निवडणुका आणि राज्यातील इतर निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

राजू शेट्टी यांनी हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर बोलताना सांगितलं की, महाविकास आघाडी सरकार हे अनेक पक्ष एकत्रित येऊन सत्तेत आलं आहे. त्यामुळे, सर्व पक्षांचा विचार होणं आवश्यक होतं, पण सध्या फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनच पक्ष सत्तेत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतर पक्षांना ते फारसं महत्त्व देत नाहीत आणि गृहीत धरत नाही असंही शेट्टींनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि सरकारला दिलेल्या इशाऱ्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील छोट्या पक्षांची भूमिका स्पष्ट होत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांची खदखदही समोर येत आहे. त्याचबरोबर, येत्या 19 मार्चला लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्यात यावे यासाठी महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या काळात हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या तरूणाने वाझेंबाबत केला खळबळजनक दावा!

13 तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना NIA ने ठोकल्या बेड्या

मला कडक लॉकडाऊन लावण्यास भाग पडू नका- उद्धव ठाकरे

धक्कादायक! राज्यात कोरोनाचा वाढता आलेख, जाणून घ्या आजची आकडेवारी

शेर की झलक सबसे अलग! युवी पाजी तुस्सी ग्रेट हो, 4 चेंडूत 4 सिक्सर, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More