बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…आता थांबणं शक्य नाही, शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या”

कोल्हापूर | राज्यात जुलै महिन्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. पावसामुळे पूरपरिस्थिती ओढावली होती. यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांत्तर करण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 23 आँगस्ट रोजी पूरग्रस्तांना मदत मिळावी या मागणीसाठी आक्रोश मोर्चाची हाक दिली होती.

स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टींना मोर्चा थांबवण्याची विनंती केली होती. मात्र सरकार वेळकाढूपणा करत आहे. शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोर्चा तर निघणारच आहे, आता थांबणं शक्य नाही, असं शेट्टी म्हणालेत. शेतकऱ्यांनो जर तुम्हास वाटत असेल सरकार फसवणूक करत असेल तर पायातलं हातात घ्या आणि मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.

पीक कर्जमाफीसह पूर पट्ट्यातील घरांचे विनाशर्त पुनर्वसन व्हावं, अशी मागणी शेट्टी यांनी सरकारकडे केली आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यत सरकारने मदत करावी. अन्यथा पुढचा निर्णय जाहीर करू. सरकारने फक्त आश्वासने देऊ नयेत, असंही शेट्टी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचे पॅकेज जाहीर केलं आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत कशा प्रकारे नुकसान झालं आहे. याचं सादरीकरणही करण्यात आलं होतं.

 

थोडक्यात बातम्या –

“राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

आम्हा बारामतीकरांना भल्या सकाळी काम सुरू करायची सवय लागलीये- अजित पवार

बॅालिवूड हादरलं, सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेलला अटक

येत्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; वाढदिवसाच्या दिवशी ओढावलं मरण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More