‘…हे प्रकरण महागात पडेल; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू (Barsu) येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशात या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादानंतर राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला गंभीर इशारा दिला आहे. हे प्रकरण महागात पडेल, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
कोकणात होणारा रिफायनरी प्रकल्प शेतकऱ्यांनी हाकलून लावल्यानंतर बारसूमध्ये हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केली जात आहे. याठिकाणीही स्थानिकांचा, शेतकऱ्यांचा प्रकल्पाला तीव्र विरो असूनही दडपशाहीच्या मार्गाने हा प्रकल्प करण्याचा घाट घातला आहे, यामागे कोणाचा हात आहे?, असा सवाल राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, बारसू प्रकल्प लादण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी घेवून आंदोलकांसोबत उभा राहीन, असं राजू शेट्टी म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.