मुंबई | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला आहे. कडकनाथ कोंबडा सातत्याने पहाटे आरोळी ठोकतो’ अशा शब्दांत त्यांनी राजू शेट्टींवर टीका केलीये.
सदाभाऊ खोत म्हणाले, “सदाभाऊ खोतांना मी काढून टाकलं असं सांगून शेट्टी हे स्वतःचं महत्त्व वाढवून घेत आहेत. मात्र ज्यांनी मला काढलं ते देखील आता तुमच्या सोबत नाहीत.”
एकत्र लढा देणार का या प्रश्नावर खोत म्हणाले, “हा सदाभाऊ खोत जोवर जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या संघटनेत परत येत नसतो. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय आणि ज्या बारामतीला तुम्ही आमदारकीचा तुकडा मागिलता, त्याच बारामतीच्या आदेशाने राज्यातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता.”
“मी राहत असलेल्या झोपडीत महाल आहे आणि तिथे आम्ही सर्व समाधानी देखील आहोत. तुम्ही ज्या महालात गेलात तिथे याचक झालात,” अशी खरमरीत टीका खोतांनी राजू शेट्टींवर केलीये.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून सोनिया गांधींनी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांना निवडलं- बराक ओबामा
नितीश कुमार फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा त्यांना पिळून फेकून देईल; माजी मंत्र्याची टीका
भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का; ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा
ठाकरे सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक; प्रवीण दरेकरांची टीका
स्वर्गीय बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया- उपमुख्यमंत्री