Rajya sabha Eelection 2024 | राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील दोन जागांसह नऊ राज्यांतील राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातून या जागेसाठी भाजपने रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील (Darhysheel patil) यांना तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्याचे नितीन पाटील (nitin patil) यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. (Rajya sabha Eelection 2024)
धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या जागेसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्जाच्या पडताळणीमध्ये अपक्षांच्या वतीने भरण्यात आलेल्या अर्जावर अनुमोदकांच्या सह्या नसल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले.
अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
या जागेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदरच आश्वासन दिलं होतं. लोकसभा निवडणुकीवेळी एका सभेत साताऱ्याच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असं अजित पवार म्हणाले होते. यानंतर नितीन पाटील यांना खासदारकीची संधी कधी मिळणार, याबाबत चर्चा होत्या.(Rajya sabha Eelection 2024)
नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची निवड
नितीन पाटील यांना आता थेट राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नितीन पाटील राज्यसभेचे खासदार होणार आहेत. नितीन पाटील हे मकरंद पाटील यांचे बंधू असून ते वाई-महाबळेश्वरचे आमदार आहेत. तर, त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे खासदार होते.
तर, भाजपचे धैर्यशील पाटील हे मूळचे रायगड जिल्ह्यातील असून ते माजी आमदार आहेत. सध्या ते रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आता त्यांना राज्यसभेच्या रुपात खासदारकी मिळणार आहे.(Rajya sabha Eelection 2024)
News Title – Rajya sabha Eelection 2024 Darhysheel patil and nitin patil elected unopposed
महत्त्वाच्या बातम्या-
आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना आर्थिक तोटा होईल, ताणतणाव वाढेल!
बदलापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक खुलासा!
विधानसभेला मनोज जरांगे पाटील नवा खेळ खेळणार?
’30 वर्षांमध्ये असं…’; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून सरन्यायाधीश संतापले
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात